Wednesday, 22 August 2012

नोकरी पहावी करून....

खूप महिने मनात येत होतं पण कागदावर काही उतरत नव्ह्तं. आज म्हणलं काही झालं तरी लिहायचंच. नाहीतर त्या सुंदर आठवणींना कायम मनाच्या कोपरयाताच रहावं लागेल आणि त्यांना तुम्हा सर्वांबरोबर share करण्याचा आनंद नाही मिळणार :-)
जशी जशी १९ तारीख जवळ येत चालल्ये तशी थोडीशी मी अंतर्मुख होत चालल्ये. याला कारण ही तसंच आहे.
१९ नोव्हेंबर २०११ ला माझ्या SO CALLED PROFESSIONAL EXPERIENCE ला   ४ वर्ष पूर्ण होतील.
खरं तर खरच वाटत नाहीये. ४ वर्ष खूप मोठा काळ वाटतो. आहे ही. पण नोकरीचा कंटाळा येण्या इतपत मोठा आहे का ?? आपल्या वडिलांची आपल्या वयाहूनही जास्त वर्ष नोकरी झाली. त्याच्या समोर तर ४ वर्ष म्हणजे सुरुवातच म्हणायला हवी.

नोकरी या शब्दाचा संबंध लहानपणी आपले आई बाबा नोकरी करतात किंवा मोठी माणसं नोकरी करतात एवढाच यायचा.Business वगैरे त्या वेळी विशेष कळत नसे. पण शाळेतली वर्ष सरत आली तशा हळू हळू गोष्टी उमगत गेल्या. फार काही कळायचं नाही पण आपण मोठे झाल्यावर हेच करायचं किंबहुना मोठी माणसं हेच करतात अशी काहीशी मनात ठाम समजूत होऊन गेलेली.
पण नोकरी मिळणं म्हणजे नक्की काय याचा साक्षात्कार Engineering च्या 3rd year ला झाला.
3rd year मधेच तुम्ही "PLACED" आहात ही गोष्ट तेव्हा फारच मोठी वाटायची. मोठमोठ्या कंपन्या Campus Placement साठी यायच्या आणि शब्दशः अगदी मोहवून टाकायच्या. Wipro TCS Infosys म्हणजे तेव्हा अगदी स्वर्ग वाटायचे. :-)  आणि अशा ठिकाणचं offer letter असणं म्हणजे आपले हात आभाळालाच लागल्यासारखे व्हायचे.
आता त्या गोष्टींचं हसू येतंय पण तेव्हाचे आपले समज खरं तर गैरसमज आठवले कि आपल्यालाच प्रश्न पडतो अरे त्या वेळचे तो विचार करणारे आपणच का..  तेव्हा companies ची नावं भुरळ घालायची आणि आता पैसा !! किती ही नाकारलं तरी package च्या कस्तुरी मृगामागे आपण आता सगळेच धावतोय.

प्रत्येकालाच आपल्या आयुष्यातल्या पहिल्या नोकरीचा पहिला दिवस कायम स्मरणात राहातो.
खूप उत्सुकता असते, बरचसं दडपण असतं आणि मुख्य म्हणजे त्या दिवशी नक्की कसं वागायचं आणि कुणाशी काय बोलायचं हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. कारण सगळेच नवीन असतात.
अजूनही त्या अपरिचित नजरा आठवतात. आणि ती अनोळखी माणसं जिगरी दोस्त होतानाही आठवतात.
खूप मस्तं वाटतं ते सर्व आठवून.

कामाच्या बाबतीत तर, आता आपल्याला काही तरी काम सांगतील आणि आपल्याला ते जमणार नाही (काम जमणार नाही हा confidence म्हणजे engineering मधे लावलेल्या दिव्यांचा उजेड :P)
मग आपल्याला लगेच कंपनीतून काढून टाकतील, अशी फार मोठी मजेदार समजूत होती. आणि थोड्याच काळात याही गोष्टीचा साक्षात्कार होतो कि आपण जे काही कॉलेज मधे शिकतो त्याचा आणि आता जे काय काम करतो त्याचा फारसा कधी संबंधच नसतो. तिथेच आपण नव्याने सर्व काही शिकतो. तेव्हा केलेली अगदी छोटी छोटी कामं देखील आपण फार मोठा तीर मारलाय अशा अविर्भावात व्हायची.
Code मधे २ lines चा change करायला सुद्धा जी काही भीती वाटायची आणि जणू काही त्या २ lines च्या  change ने पूर्ण application च चालायचं बंद होणार आहे असं वाटायचं. Seniors मदत करायचे पण मूड मधे आले कि मुद्दाम घाबरवायचं काम जास्त करायचे. 
Office मधली लोकं तेव्हा colleagues होतात. त्यातल्या काही Colleagues चं रुपांतर Friends मधे होतं आणि काही मात्र colleagues च राहतात.  
मुलं हिरवळीचा आनंद घेत असतात आणि मुली भवर्यांचा :-) कुणाला इथे जीवाला जीव लावणारे दोस्त मिळून जातात, कुणाला नुसतेच गरज सरो वैद्य मरो वाले friends मिळतात, कुणाला gossip friends तर कुणाला अगदी आयुष्याचा साथीदार ही मिळून जातो. सगळेच जण "har ek friend jaroori hota hai " म्हणत इथे ही राहतात.     
Office मधलं Politics हा फक्त तेव्हा ऐकलेला विषय अजून प्रत्यक्षात अनुभवायचा असतो. सगळं छान छान वाटायचं सुरुवातीला. नव्याची नवलाई नऊ दिवसांची म्हणतात त्यातलं..
नंतर नंतर तेच तेच काम वाटतं. सर्वच काही तेच तेच होऊन जातं.
मग Appraisal चे वारे वाहतात आणि Idealistic आणि Actual या दोन शब्दांचा अर्थ उदाहरणां सहित अगदी स्पष्ट करून जातात :-)
या दरम्यान आपण Issues, Defects, Bugs, Project Plan, Estimation, Ball-Park Figure, Pet Project,
Escalations, Enhancements, Change Requests, Man Months, Showstoppers, Priority, Severity, Client Call , deadline, deliverables, Hot Fixes, WSR  हे असले शब्द नव्याने शिकतो किंवा त्यातल्याच जुन्या शब्दांचे अर्थ नव्याने शिकतो.
मग normal बोलताना ही "काही हरकत नाही" ला आपण "no issues ", "आयत्या वेळी ठरवू " ला "Runtime decide करू" वगैरे म्हणायला लागतो.
असं एकंदर हे नोकरी प्रकरण आपल्या नसानसात भिनत जातं.
कुणाला खूपच कंटाळा येतो, वैताग येतो, ते नोकरी सोडून दुसऱ्या उद्योगाला लागतात, स्वतःला Business मधे छान establish करतात तर maximum जण शिव्या घालत का होईना सर्व सहन करत पुढची वाट सुरु ठेवतात. २ वर्षात ४ नोकऱ्या बदलतात. इथे नाहीतर दुसरी कडे तरी काहीतरी वेगळं असेल अशा समजुतीने आणि Package च्या वाढत्या आकड्याच्या आकर्षणाला मोहून जाऊन नवनवीन ठिकाणी जातात. तर काही हातचं सोडून पळत्याच्या मागे का जा , या विचाराने आहे त्यातच समाधान मानतात. पण नोकरी सुरूच..
४ वर्षात आपण काय शिकलो?? हा तर खूप मोठाच प्रश्न आहे. 4 yrs Experienced व्यक्तीला नक्की काय येणं अपेक्षित आहे हेच मुळी अजून समजत नाही.
जे काम करतोय त्याला "Knowledge  " म्हणायची देखील भीती वाटते अशी अवस्था !!!
हा प्रवास आत्ता कुठे सुरु झालाय. तो किती वेळेचा ते खरच कुणालाच ठाऊक नसतं. पण सर्वच जण चालत राहतात. चालायचंच :-)

No comments:

Post a Comment