Wednesday 22 August 2012

कुण्या ATM कार्ड ची विरह गाथा

"अगं चारुता, Card आत मधेच अडकलं. बाहेरच येत नाहीये !!"
"अडकलं म्हणजे ?"
"म्हणजे काय? काय विचारतेस?? अगं केव्हाचं Exit करून Card बाहेर काढायचा प्रयत्न करत्ये. पण काही हालचालच होत नाहीये machine मधे."
"थांब मी बघते."
असं म्हणून चारुताने त्या ATM machine ला 2-4 दणके दिले.
"ए अगं ते machine म्हणजे काय आपला जूना TV आहे? कि मुंग्या दिसायला लागल्या कि इकडून तिकडून त्या TV ला फटके मारले कि झाला ठीक?"
"Madam TV चं काय घेऊन बसलीस!! मी तर आमच्या Computer ला हि असं मारत असते मधे मधे. मग येतो line वर. हे ATM पण मारल्यावर बघ कार्ड कसं आपोआप बाहेर टाकेल"
"अगं हि काय वेळ झाली विनोद करायची ? माझं Card एक तर आत अडकलंय आणि तू इथे ...."

या संवादाने नांदी झाल्या नंतर मग तिथल्या Security guard ला बोलावून ATM मधून Card बाहेर काढण्याचा अजून एक अयशस्वी प्रयत्न करणे, मग त्याच्या "अहो ते machine असं मधे मधे बंद पडतं" या निर्णायक पवित्र्यावर "अहो मग आधी नाही का सांगता येत?? वापरलंच नसतं हे!! " या आणि त्या पुढच्या न सांगता येणाऱ्या क्रोध युक्त उद्गाराने पडदा टाकला...

मग पटापट फोन लावले गेले, बँकेचे Helpline numbers मिळवले, कसंतरी करून एकदाचं Card BLOCK करून टाकलं. आणि त्याच वेळी So Called Customer Care वाल्याने "तुमचं नवीन Card यायला अजून किमान 15 दिवस तरी लागतील..." ही  सुवार्ता कानावर घातली.  
आता मात्र माझा धीर सुटायला लागला. मस्त shopping साठी आम्ही दोघी निघालेलो. म्हणून जाता जाता पैसे काढायचे ठरवले आणि हे असं झालं. 

"आता काय करू ?" असा प्रश्न मला पडला. खरं तर एवढं tension घ्यायची गरज नव्हती कारण Card तर व्यवस्थित BLOCK झालं होतं आणि तसे साधारण दोन तीनशे रुंपये माझ्या कडे होते आणि त्याही पेक्षा महत्वाचं इतके सारे friends, relatives इथे आहेत तर अगदी लागलीच तर कुणी ही मदत केली असती.पण तरीही का कोणास ठाऊक खूप विचित्र feeling येत होती. कुणावर तरी अवलंबून रहावं लागतंय कि काय असं सारखं वाटत होतं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर, माझ्या कडे आत्ता फक्त 300 रुपये आहेत आणि मला ते 15 दिवस पुरवायचे आहेत, हि कल्पनाच मुळी मला tension देत होती कारण आत्ता पर्यंत ATM म्हणजे "Automated Teller Machine " पेक्षा "Any Time Money" असाच अर्थ मी लावत होते आणि काम साधत होते.

मनात आलं ATM वापरा , गरज लागली ATM वापरा , हॉटेल मधे गेलं कार्ड वापरा, shopping करायच्ये कार्ड आहेच.. वेळ नाही काळ नाही 24X7 ATM CARD आहेच.
आणि अचानक आता ते माझ्याकडे नाही, हेच मुळी मला accept करता येत नव्हतं. क्षणभर तुम्ही कल्पना करा कि तुमचं ATM CARD तुमच्याकडे नाही आणि तुम्ही मुंबईत आहात....
तर अशी सुरुवात झाली या गोष्टीला. मग काय माझा तर shopping चा सगळा मूडच गेला( मूड पेक्षा पैसे च गेले होते खरं तर  :P ) . चारुताने ही ठरवल्या पेक्षा खूपच कमी shopping करून माझ्या दुखात ती ही सहभागी झाली.

घरी जाताना एकमेकीना "जास्त लांब नाहीये घर इथून", "आपला चालणं होत नाही हल्ली " , "जास्त bags नाहीयेत हातात" अशी अनेक कारणं देऊन "चालतंच घरी जाऊया" असं शेवटी ठरवलं गेलं.  
रात्री झोपण्या पूर्वी रोजचा हिशेब लिहायची सवय आहे. त्यादिवशीचा खर्च लिहिला आणि अचानक हसू आलं. रोज मी नुसता आज किती खर्च झाला ते लिहिते. रोजचे आकडे वेगवेगळे.  पण उद्यापासून मला पुढच्या 15 दिवसांचा माझा पूर्ण खर्च माहित होता. रुपये 300 . तो तेवढाच होतोय का कुठेतरी सोय बघावी लागत्ये हा प्रश्न मात्र सारखा पडत होता.

"Lost my Debit CARD " असं Facebook वर status update करावा असा विचार मनात आला. पण त्यावर लोकांनी Likes केले तर मला उलट मुळीच आवडलं नसतं आणि comments कम प्रश्नांना उत्तरं द्यायची मुळीच इच्छा झाली नसती. आणि "Gud Nite ", "Not feeling Well", "Feeling Happy" असेही status updates देणार्यांच्या पंगतीला मग येऊन बसावं लागलं असतं. हल्ली "मी आता मस्त Pastry खाणारे" हे आपल्या पोटाला कळायच्या आधी facebook वरून जगाला कळतं आणि मगच तोंडाला पाणी सुटलेल्या जिभेला तिचा हिस्सा मिळतो.            

ते सर्व जाऊदे. तो एक वेगळाच मोठा विषय आहे. नंतर केव्हातरी त्या कडे लक्ष घालूया.
दुसऱ्या दिवशी मात्र, रिक्षा चा मीटर चा आकडा, canteen मधला नाश्ता, रोज रोज मेस चा डबा खायचा कंटाळा आल्या मुळे मागवलेलं Parcel, खूप काम केलं ऑफिस मधे,दमलो, आता रिक्षा ने जाऊया असा स्वतःला म्हणणं,  घरी जाताना आज च नेमकं DryClean आणि इस्त्रीचे कपडे न्यायला लागणं आणि हमखास नको त्या वेळी तुटणाऱ्या चपलेने या वेळी ही बरोबर आत्ताची वेळ साधणं अशा सारख्या बऱ्याच गोष्टी घडल्यामुळे पुढचं चित्र मला हमखास दिसू लागलं.
आता मात्र "पाई पाई एक करणं" मला गरजेचं होतं. आपण खूप जास्त खर्च करतो या निष्कर्षा पर्यंत मी केव्हाच येऊन पोहचले होते.

खरंतर हे मनात कुठे तरी आधीच कळत होतं की आपण आजकाल किती अनावश्यक गोष्टींवर पैसे वाया घालवतोय. पण आहे ना कार्ड मग करा खर्च, उधळा पैसे.  काटकसर वगैरे शब्द हल्ली कुणाला माहित नाहीत असं वाटायला लागलंय.
नोकरी सुरु होईपर्यंत घरच्यांवर अवलंबून असतो. पैशाची किंमत तेव्हा ही होतीच की पण तेव्हा वाटायचं आपण स्वतः कमवायला लागल्यावर आपल्याला त्याची खरी किंमत कळेल. पण झालं उलटंच. नोकरी सुरु झाल्या नंतर हात जास्तीच सैल सुटायला लागला.
300 रुपये 15 दिवसांचा हिशेब लावणं कठीण जात होतं कारण आज काळ 3 दिवसानाच मला 300 लागत होते. त्यातले किती गरजेचे आणि किती फालतुचे त्याचं गणित माझ्या मनाने ATM कार्ड आत अडकलं तेव्हाच कुठेतरी सोडवला होतं बहुदा.

तर असे हळू हळू दिवस  जात होते. त्यातच मुंबईत रिक्षांचा संप सुरु झाला आणि झाला ते चांगलं म्हणावं की वाईट याचा विचार मी करू लागले. आमचं ऑफिस पण चालायला गेलं तर थोडं दूर आहे आणि रिक्षाने गेलं तर जवळ आहे असं विचित्र ठिकाणी आहे. आता रिक्षा पण संपावर म्हणजे चालत नाहीतर BEST बस हे दोनच पर्याय होते. कुठली बस तिथे जाते की नाही, याची पण मला माहिती नव्हती. तरी म्हणला, आता प्रयत्न तर करून बघूया. नाहीतर 11 number बस आहेच.

"ही बस नागरदास रोड ला जाते ना?" 308 number च्या बस मधे चढल्यावर लगेचच भीत भीत मी Conductor काकांना विचारलं.
"तुम्हाला कुठे जायचय?" इति काका.
"नागरदास रोड"
"मग जाईल बस तिकडे" असं मिश्कील पणे म्हणत, जणू काय वर्षानुवर्ष ही बस माझ्या येण्याची वाट बघत होती या थाटात काकांनी मला तिकीट दिलं.
माझ्या घरापासून जवळच असलेल्या बस stop पासून ऑफिस च्या थोडं सच दूर पर्यंत बस आहे, या गोष्टीचा साक्षात्कार मला झाला.
तिकीट रुपये - 4 आणि मी रिक्षाला देत होते रुपये- २०
माझं मलाच हसू आलं. वेळचा विचार केलं तर १५ च मिनिटं जास्त लागत होती. 
Thanks to AutoRikshaw drivers ..   मला BEST बस ची किंमत कळली :-)

अशा बऱ्याच गोष्टी हळू हळू जाणवत गेल्या. पण १५ दिवस काढणं actually practical नाहीये. मग अजून एका नवीन गोष्टीचं ज्ञान मिळालं. गोष्ट जुनीच होती पण ती नव्याने शिकले.
पैसे कुणाकडे मागायचे नाहीत हे मी तेव्हाच ठरवलं होतं. आता बँकेत जाऊन व्यवस्थित withdrawal slip भरून पैसे काढणं हाच मार्ग होता.
खरंतर पूर्वी कुठे होते ATM कार्ड ?? महिन्याभराला लागणारे पैसे आधीच तर काढून ठेवले जायचे आणि तेच वापरायचे. दिवसाचे खर्चाचे आकडे साधारण तेच असायचे. Financial management आपल्या
आई वडीलांकडून आधी आपल्याला शिकायला पाहिजे.   

तर शेवटी मी बँकेत जाऊन पोहोचले. तिथे आत शिरल्यावर, इकडे तिकडे बरंच शोधलं पण withdrawal slip काही केल्या मला सापडली नाही. आपण बावळट सारखे फिरतोय आणि सगळे लोक आपल्यालाच बघतायत असं मला वाटायला लागलं. मग थोडा धीर करून तिथल्या Security Guard लाच मी Slip कुठे मिळेल विचारलं. खरंतर हा प्रश्न विचारल्या वर त्याच्या हातातली बंदूक माझ्यावर रोखून तो मला "हे पण आता मी सांगू का ?? एवढंही माहित नाही का??" असं माझ्यावर ओरडेल असं मला वाटलं. पण त्यांनी मला शांतपणे सांगितलं "आता पूर्वी सारख्या इथे withdrawal slips नसतात. चेक वरच Self लिहून पैसे काढतात" . हे ऐकून माझी मलाच लाज वाटली की आपल्याला हे ही माहित असू नये. पण बँकेत जाऊन पैसे काढायची हल्ली वेळच कुठे येते.
नशिबाने मी चेकबुक सोबत नेल्यामुळे, पुढचं काम सोपं झालं. किती पैसे काढायचे हा हिशेब मी आधीच करून ठेवला होता.

कारण यावेळी मी Credit वरून Debit ठरवणार होते. उलट नाही :-)

नोकरी पहावी करून....

खूप महिने मनात येत होतं पण कागदावर काही उतरत नव्ह्तं. आज म्हणलं काही झालं तरी लिहायचंच. नाहीतर त्या सुंदर आठवणींना कायम मनाच्या कोपरयाताच रहावं लागेल आणि त्यांना तुम्हा सर्वांबरोबर share करण्याचा आनंद नाही मिळणार :-)
जशी जशी १९ तारीख जवळ येत चालल्ये तशी थोडीशी मी अंतर्मुख होत चालल्ये. याला कारण ही तसंच आहे.
१९ नोव्हेंबर २०११ ला माझ्या SO CALLED PROFESSIONAL EXPERIENCE ला   ४ वर्ष पूर्ण होतील.
खरं तर खरच वाटत नाहीये. ४ वर्ष खूप मोठा काळ वाटतो. आहे ही. पण नोकरीचा कंटाळा येण्या इतपत मोठा आहे का ?? आपल्या वडिलांची आपल्या वयाहूनही जास्त वर्ष नोकरी झाली. त्याच्या समोर तर ४ वर्ष म्हणजे सुरुवातच म्हणायला हवी.

नोकरी या शब्दाचा संबंध लहानपणी आपले आई बाबा नोकरी करतात किंवा मोठी माणसं नोकरी करतात एवढाच यायचा.Business वगैरे त्या वेळी विशेष कळत नसे. पण शाळेतली वर्ष सरत आली तशा हळू हळू गोष्टी उमगत गेल्या. फार काही कळायचं नाही पण आपण मोठे झाल्यावर हेच करायचं किंबहुना मोठी माणसं हेच करतात अशी काहीशी मनात ठाम समजूत होऊन गेलेली.
पण नोकरी मिळणं म्हणजे नक्की काय याचा साक्षात्कार Engineering च्या 3rd year ला झाला.
3rd year मधेच तुम्ही "PLACED" आहात ही गोष्ट तेव्हा फारच मोठी वाटायची. मोठमोठ्या कंपन्या Campus Placement साठी यायच्या आणि शब्दशः अगदी मोहवून टाकायच्या. Wipro TCS Infosys म्हणजे तेव्हा अगदी स्वर्ग वाटायचे. :-)  आणि अशा ठिकाणचं offer letter असणं म्हणजे आपले हात आभाळालाच लागल्यासारखे व्हायचे.
आता त्या गोष्टींचं हसू येतंय पण तेव्हाचे आपले समज खरं तर गैरसमज आठवले कि आपल्यालाच प्रश्न पडतो अरे त्या वेळचे तो विचार करणारे आपणच का..  तेव्हा companies ची नावं भुरळ घालायची आणि आता पैसा !! किती ही नाकारलं तरी package च्या कस्तुरी मृगामागे आपण आता सगळेच धावतोय.

प्रत्येकालाच आपल्या आयुष्यातल्या पहिल्या नोकरीचा पहिला दिवस कायम स्मरणात राहातो.
खूप उत्सुकता असते, बरचसं दडपण असतं आणि मुख्य म्हणजे त्या दिवशी नक्की कसं वागायचं आणि कुणाशी काय बोलायचं हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. कारण सगळेच नवीन असतात.
अजूनही त्या अपरिचित नजरा आठवतात. आणि ती अनोळखी माणसं जिगरी दोस्त होतानाही आठवतात.
खूप मस्तं वाटतं ते सर्व आठवून.

कामाच्या बाबतीत तर, आता आपल्याला काही तरी काम सांगतील आणि आपल्याला ते जमणार नाही (काम जमणार नाही हा confidence म्हणजे engineering मधे लावलेल्या दिव्यांचा उजेड :P)
मग आपल्याला लगेच कंपनीतून काढून टाकतील, अशी फार मोठी मजेदार समजूत होती. आणि थोड्याच काळात याही गोष्टीचा साक्षात्कार होतो कि आपण जे काही कॉलेज मधे शिकतो त्याचा आणि आता जे काय काम करतो त्याचा फारसा कधी संबंधच नसतो. तिथेच आपण नव्याने सर्व काही शिकतो. तेव्हा केलेली अगदी छोटी छोटी कामं देखील आपण फार मोठा तीर मारलाय अशा अविर्भावात व्हायची.
Code मधे २ lines चा change करायला सुद्धा जी काही भीती वाटायची आणि जणू काही त्या २ lines च्या  change ने पूर्ण application च चालायचं बंद होणार आहे असं वाटायचं. Seniors मदत करायचे पण मूड मधे आले कि मुद्दाम घाबरवायचं काम जास्त करायचे. 
Office मधली लोकं तेव्हा colleagues होतात. त्यातल्या काही Colleagues चं रुपांतर Friends मधे होतं आणि काही मात्र colleagues च राहतात.  
मुलं हिरवळीचा आनंद घेत असतात आणि मुली भवर्यांचा :-) कुणाला इथे जीवाला जीव लावणारे दोस्त मिळून जातात, कुणाला नुसतेच गरज सरो वैद्य मरो वाले friends मिळतात, कुणाला gossip friends तर कुणाला अगदी आयुष्याचा साथीदार ही मिळून जातो. सगळेच जण "har ek friend jaroori hota hai " म्हणत इथे ही राहतात.     
Office मधलं Politics हा फक्त तेव्हा ऐकलेला विषय अजून प्रत्यक्षात अनुभवायचा असतो. सगळं छान छान वाटायचं सुरुवातीला. नव्याची नवलाई नऊ दिवसांची म्हणतात त्यातलं..
नंतर नंतर तेच तेच काम वाटतं. सर्वच काही तेच तेच होऊन जातं.
मग Appraisal चे वारे वाहतात आणि Idealistic आणि Actual या दोन शब्दांचा अर्थ उदाहरणां सहित अगदी स्पष्ट करून जातात :-)
या दरम्यान आपण Issues, Defects, Bugs, Project Plan, Estimation, Ball-Park Figure, Pet Project,
Escalations, Enhancements, Change Requests, Man Months, Showstoppers, Priority, Severity, Client Call , deadline, deliverables, Hot Fixes, WSR  हे असले शब्द नव्याने शिकतो किंवा त्यातल्याच जुन्या शब्दांचे अर्थ नव्याने शिकतो.
मग normal बोलताना ही "काही हरकत नाही" ला आपण "no issues ", "आयत्या वेळी ठरवू " ला "Runtime decide करू" वगैरे म्हणायला लागतो.
असं एकंदर हे नोकरी प्रकरण आपल्या नसानसात भिनत जातं.
कुणाला खूपच कंटाळा येतो, वैताग येतो, ते नोकरी सोडून दुसऱ्या उद्योगाला लागतात, स्वतःला Business मधे छान establish करतात तर maximum जण शिव्या घालत का होईना सर्व सहन करत पुढची वाट सुरु ठेवतात. २ वर्षात ४ नोकऱ्या बदलतात. इथे नाहीतर दुसरी कडे तरी काहीतरी वेगळं असेल अशा समजुतीने आणि Package च्या वाढत्या आकड्याच्या आकर्षणाला मोहून जाऊन नवनवीन ठिकाणी जातात. तर काही हातचं सोडून पळत्याच्या मागे का जा , या विचाराने आहे त्यातच समाधान मानतात. पण नोकरी सुरूच..
४ वर्षात आपण काय शिकलो?? हा तर खूप मोठाच प्रश्न आहे. 4 yrs Experienced व्यक्तीला नक्की काय येणं अपेक्षित आहे हेच मुळी अजून समजत नाही.
जे काम करतोय त्याला "Knowledge  " म्हणायची देखील भीती वाटते अशी अवस्था !!!
हा प्रवास आत्ता कुठे सुरु झालाय. तो किती वेळेचा ते खरच कुणालाच ठाऊक नसतं. पण सर्वच जण चालत राहतात. चालायचंच :-)